top of page
  • Writer's pictureGurudas Nulkar

वेताळ टेकडीचा मेकप!

तुम्हाला  अस्सल  पुणेकर  पाहीचे  आहेत  का?  मग  या  पुण्याच्या  टेकडी  वर,  इथे  तुम्हाला  भेटतील  अस्सल पुणेकर.. . बारतोंडी, सालाई,  खैर, शिसु,  चंदन  असे  कित्येक  वृक्ष  ‘पुणेरी’ पदवीचे  खरे  मानकरी  आहेत.  माणसानी ह्या जागेवर वस्ती करून ‘पुणे’ नामकरण करायच्या  हजारो  वर्षे  आधीपासून  या पुणेकरांची मुळे  इथे  रुजलेली  आहेत.  पुण्यनगरीचा इतिहास  त्यानी  प्रत्यक्ष  घडताना पहिला  आहे.


Santalum_album_(Chandan)_in_Hyderabad,_AP_W2_IMG_0023

Chandan ( Wikipedia | J.M.Garg )



640px-Striped_Hyena_Adult Sumit Moghe

Striped Hyena ( Wikipedia | Sumit Moghe )


काही शे वर्षापूर्वी वेताळ टेकडीवरील वृक्षाची संख्या खूप जास्त होती. परंतु गेल्या 100 वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली अन् टेकडी जवळजवळ बोडकी झाली. मग हळूहळू देवळे आली, टाक्या बांधल्या गेल्या, पाइप टाकले गेले, सरकारी कचेरिनी आपले पाय पसरले, Gliricidia लावला गेला… पुणेकरानि टेकडीचा उपभोग वाढवला अन त्या खर्या पुणेकरांची आहुती  दिली  गेली.  जशी  झाडे  कमी  झाली  तशी   टेकडीवर आश्रय  घेण्यास येणार्‍या पशुपक्षयाची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. काही वर्षापूर्वी पर्यंत इथे तरस (striped hyena) येत असे. आजही टेकडी वर अनेक प्रकारचे गरूड व शिकारी पक्षी येतात, पण प्रणी मात्र दुर्मिळ झालेत.  अशा मानवी हस्तक्षेपामुळे जरी त्यांची संख्या रोडावली तरी ही टेकडी व त्यावरील वनश्री आपले निसर्गातील कार्य आजही  नित्य  नियामाने  व् चोख पणे करीत आहेत. इथे येणार्‍या पहुण्याना आल्हाददायक  वातावरण  देणे,  हजारो  पशुपक्ष्याना आश्रय  देणे  व  निसर्ग  सेवेत  (nature’s services) आपले योगदान देणे – पावसाची विभागणी करणे, हवामानाचे संतुलन राखण्यास मदत करणे, ऑक्सिजन व इतर वायुंचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे, खाद्य साखळी चालू ठेवणे अशा अनेक सेवेमधे ही टेकडी व तिचे सवंगडी आपली भूमिका निरपेक्शपणे निभावत आहेत. या सेवेचे लाभार्थी आपण सर्वच आहोत हे कदाचित आपल्या ध्यानातही आले नसेल. तसेच ही टेकडी आपल्याला मानसिक शांततेसाठी एक उत्तम स्रोत आहे. रोजच्या धकाधकी च्या जीवनातून सुटके साठी आपण टेकडी गाठतो.  टेकडी आपल्याला क्षणभर का होई ना पण वास्तवापासून दूर नेते.  हा उरलासुरला निसर्गही किती आनंद देतो!

आज  आपण  सुद्न्य  पुणेकरासमोर  एक  यक्ष  प्रश्न  उभा  आहे … अशा  नाजूक  पर्यावरणमध्ये  आपल्या मौजेसाठी  सेमेंट  वाटा,  मनोरंजक   छत्र्या  व  शोभेचे  दिवे  लाउन  त्यास  अधिक  दुखवायचे  की  त्याना  त्यांच्या कलेने  जगू  देऊन  फक्त  निरुपद्रवि  आस्वाद  घ्यायचा? आजवर  पुणे करानि   नेहमीच   दुसर्‍याच्या  हिताचा  भान  ठेऊन निर्णय घेतले  आहेत.  आज  वेळ  आहे  ती  आपल्या  मूक  पुणेकर बांधावाची  बाजू  लढवण्याची, त्याच्या संवर्धनाची. आपली सदसदविवेक  बुद्धी  त्यांच्यासाठी  वापरायची.  अशी बांधकामे  व  मानवी  हस्तक्षेप  करून हा उर्वरित निसर्ग तर दुखावला जाईलच पण आपल्यालाही त्याची झळ आज ना उद्या नक्कीच पोहोचेल.


Vetal_tekdi_quarry

Quarry on Vetal Tekdi (Alaka Yerawdekar)


निसर्ग आपले काम करतच राहील असे आपण किती सहजपणे गृहीत धरतो……हे लक्षात न घेता की त्याला जरूर असलेले घटक जर आपण संपवले तर काही खैर नाही. निदान आपल्या भल्यासाठी तरी ही आपली टेकडी वाचवूया!

खरोखरी ‘पुण्यभूषण’ असलेली ह्या वेतळ टेकडीवर ईको-पार्क (eco-park) करण्याचा प्रस्ताव आपण थांबवणे आवश्यक आहे. टेकडीवर रोज येणारे तर विरोधात आहेतच पण इतर पुणेकारानिही पाठिंबा देणे आवश्यक आहे.

गुरूदास नूलकर एकोलॉजिकल सोसाइटी

अधिक माहिती या वेबसाइट्स वर जा.

http://www.punemirror.in/pune/civic/Citizens-petition-against-eco-park-trail-at-tekdis/articleshow/44426970.cms

http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=4632607815698083283&SectionId=5494605966908300850&SectionName=Civic&NewsDate=20141007&NewsTitle=ST%20SPECIAL:%20%E2%80%98Eco-tourism%E2%80%99%20plan%20on%20Vetal%20Tekdi%20irks%20Greens

https://www.change.org/p/chief-conservator-of-forests-prevent-damage-to-the-tekdi

https://www.dropbox.com/sh/x5klkenhfd5mhos/AAAq99s07zR_BvhcWCmeZVE4a?dl=0

#pune #Tekdi #Vetaltekdi

8 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page